
प्रेमाचा त्रिकोण म्हणजेच लव्ह ट्रँगलमुळे एका तरुणाचा जीव गेला आहे. या तरुणाची त्याच्याच प्रेयसीने दुसऱ्या प्रियकरासोबत या तरुणाची हत्या केल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटंबियांनी केला आहे. या प्रकरणी तरुणाच्या प्रेयसीसोबत पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही धक्कादायक घटना पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यात घडली आहे.
या प्रकरणात हत्या झालेल्या तरुणाचे वय 19 वर्ष असून त्याची प्रेयसी अल्पवयीन आहे. या प्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे. चंदननगरचे डीसीपी अरविंद आनंद यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलीसह पाच जणांना ताब्यात घेत त्यांची चौकशी करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
मुलीच्या घराजवळ अशोक प्रसाद नावाच्या तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला. तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती पोलिसांनी मिळाल्यावर ते घटनास्थळी दाखल झाले. अशोक प्रसादची त्याचा प्रेयसीनेच हत्या केल्याचा आरोप अशोकच्या कटुंबियांनी केला आहे.
अशोक प्रसादचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. ती मुलगी अशोकवर प्रेम करत होती. तसेच ती एका अर्जुन दास या 20 वर्षांच्या तरुणावरही प्रेम करत होती. या प्रेमाच्या या त्रिकोणातूनच अशोकची हत्या झाल्याचे त्याच्या कुटंबियांनी सांगितले. ती मुलगी अर्जुनदासवर प्रेम करत असल्याचे अशोक प्रसादला समजले. त्याने प्रेयसीला याबाबत समज दिली.
अशोकला प्रेमसंबंधाबाबत समजल्याने मुलीला संताप आला होता. तसेच त्याने समज दिल्याचा रागही तिच्या मनात होता. त्यामुळे अर्जुनदास सोबत तिने अशोकची हत्या करण्याचा कट रचला. त्या दोघांनी अशोकच्या डोक्यावर शस्त्राने वार केला. त्यानंतर क्रूरपणे त्याची हत्या करण्यात आली,असा आरोप अशोकच्या कटुंबियांनी केला आहे.
अशोक प्रसादचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून याप्रकरणी त्याची अल्पवयीन प्रेयसी, अर्जुनदाससह पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरू असून लवकरच या हत्याप्रकरणाचा उलगडा होईल, असे पोलिसांनी सांगितले.



























































