
सर्वांना वाचवणारे सुपरहिरो लहान मुलांमध्ये खूपच लोकप्रिय असतात आणि त्यांच्या छोट्या व चौकस कल्पनाशक्तीला चालनाही देतात. सध्याच्या काळात तर हे अधिकच खरे ठरत आहे! हा थरार आणि रोमांच नवीन थरारक सुपरहिरो सीरिज “ब्लेझिंग टीम्स”च्या डिजिटल प्रीमियरमुळे अधिकच वाढणार आहे.
वूट किड्स या हिंदुस्थानातील केवळ लहान मुलांना समर्पित अशा एकमेव मल्टी-फॉरमॅट प्लॅटफॉर्मवर ही मालिका दाखवली जाणार आहे. ही नवीन अॅनिमेशन मालिका प्री-टीन प्रेक्षकांसाठी आहे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिला खूपच चांगला प्रतिसाद यापूर्वीच मिळाला आहे.
अल्फा ग्रुप आणि गाँगडाँग अल्फा अॅनिमेशन अँड कल्चर या अॅनिमेशन स्टुडिओने या मालिकेची निर्मिती केली आहे.
या नवीन अवतारातील ब्लेझिंग टीम्स सबस्क्रायबर्सना यो क्वों दो नावाच्या जादूई विश्वात घेऊन जाते, यो क्वों दो या प्रकारात यो-यो आणि मार्शल आर्टसच्या कौशल्यांची सांगड घातली जाते. ही खिळवून ठेवणारी साहसे करत आहे पार्कर बेट्स, मॅडी स्टोन, स्कॉट हार्डी आणि विल्सन टिश यांची मस्त चौकडी. ही चौकडी म्हणजेच ब्लेझिंग टीम. टीमचे मेंटॉर आहेत वाइज मास्टर लाओ-शी. या मुलांच्या युनियन सिटी नावाच्या गावावर डूम्सडेचे रहस्य घोंघावू लागते, तशी ही सामान्य टीनएजर मुले आपल्या असामान्य क्षमतांचा शोध घेतात. एक प्रश्न उरतोच- हे टीनएजर हिरो, त्यांना व त्यांच्या शहराला धोका निर्माण करणाऱ्या, काळ्या अंधाऱ्या ढगांमध्ये प्रकाश निर्माण करू शकतील का?
“आमच्यासाठी, “ब्लेझिंग टीम्स”च्या माध्यमातून वूट किड्स/व्हायकॉम 18 शी सहयोग करण्याचा अनुभव, थरारक आहे. हा एक अफलातून ब्रॅण्ड आहे. त्याचे आंतरराष्ट्रीय ट्रॅक रेकॉर्ड अत्यंत लक्षणीय आहे आणि हिंदुस्थानच्या बाजारपेठेतही यशस्वीरित्या पदार्पण करण्यासाठी या ब्रॅण्डला विस्तृत मार्केटिंग सहाय्य मिळेल,” असे अल्फा ग्रुपमधील मीडिया, टीव्ही/व्हीओडी आणि सीपी विभागाचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष (व्हीपी) अँटॉइन एर्लिग्मान यांनी सांगितले.
वूट किड्सचे कंटेण्ट हेड आशुतोष पारेख या सहयोगाबद्दल म्हणाले, “वूट किड्सवर आम्ही आमच्या छोट्या प्रेक्षकांना संपूर्ण मनोरंजनाची अमर्यादित मेजवानी देऊन यशस्वीरित्या खिळवून ठेवले आहे. यात आता ‘ब्लेझिंग टीम: मास्टर्स ऑफ यो क्वों दो’ची भर पडत आहे. आम्ही जागतिक स्तरावरील दमदार कंटेण्टवर सातत्याने भर देत आहोत आणि जन्मापासून डिजिटल विश्वाचे रहिवासी असलेल्या लहान मुलांच्या आवडत्या व्यक्तिरेखा व मनोरंजनासाठी देशातील वन-स्टॉप डेस्टिनेशन म्हणून आमचे स्थान अधिक भक्कम करत आहोत. खरे तर या कंटेण्टने वयाची मर्यादाही ओलांडली आहे. आमच्या कार्यक्रमांबद्दलचे आकर्षण विस्तृत आहे. ही नवीन अवतारातील, अॅक्शन व साहसाने प्रेरित अॅनिमिटेड मालिका लहान मुलांना खिळवून ठेवेल आणि त्यांच्यात शक्ती व जबाबदारीचे भानही बाणवेल. आम्ही ग्राहकांकडून मिळालेल्या कंटेण्टबाबतच्या माहितीचा उपयोग करून घेतो आणि लहान मुलांसाठीच्या कंटेण्टची वाढती मागणी पूर्ण करतो. आमच्या प्लॅटफॉर्मवर नवनवीन गोष्टी आणि सर्वोत्तम व्यक्तिरेखा आणत राहणे तर या विभागातील आघाडीचे स्थान कायम ठेवण्यासाठी तसेच पालक व मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी साहजिक आहे.”




























































