भेंडीबाजार येथे लिफ्ट व लोखंडी मास्कच्या अपघातात दोघे ठार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भेंडीबाजार येथे दोन वेगवेगळय़ा अपघातांत दोघा मजुरांचा मृत्यू झाला. या दोन्ही ठिकाणी अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बोहरी मोहल्ला येथे एसबीयूटी क्लस्टर 1 या ठिकाणी हायड्रो मशीन व्रेनचा सुमारे 15 किलो वजनाचा लोखंडी मास्क उचलताना मास्कला बांधलेला सुती पट्टा निसटल्याने त्या ठिकाणी काम करणाऱया किस्मत शेख (25) या मजुरावर पडला. यात गंभीर जखमी झालेल्या किस्मतला तत्काळ नजीकच्या इस्तितळात नेण्यात आले, मात्र दाखल करण्यापूर्वी डॉक्टरांनी किस्मतला मृत घोषित केले. दरम्यान बोहरा मोहल्ला येथे कस्ट्रक्शनचे काम सुरू असताना लिफ्टची तार तुटल्याने सय्यद अली विष्वरशी (22) आणि करीमुल खान (22) हे दोघे लिफ्टसह खाली कोसळले. यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी  जे. जे. इस्पितळात नेण्यात आले, मात्र उपचार सुरू असताना सय्यद अली याचा मृत्यू झाला.