
अमेरिकेत एक विचित्र घटना समोर आली आहे. अमेरिकेत एका युगुलाला धावत्या गाडीत रोमान्स करणे चांगलेच महागात पडले आहे. धावत्या गाडीत महिला अचानक तिच्या जोडीदारासोबत रोमान्स करायला लागली. त्यामुळे चालकाचा गाडीवरचा ताबा गेला आणि अपघात झाला.
local10.com च्या वृत्तानुसार, ही घटना अमेरीकेत घडली आहे. North Ocean Boulevard येथून ही एसयूव्ही गाडी जात होती. यामध्ये एक युगुल प्रवास करत होतं. दरम्यान जोडीदार गाडी चालवत असताना महिलेने त्याच्यासोबत रोमान्स करायला सुरुवात केली आणि जोडीदाराचा गाडीवरचा ताबा जावून समोरून येणाऱ्या फेडेक्स ट्रकला जबरदस्त धडक बसली. समोरच्या ट्रकमध्येही दोन लोकं प्रवास करत होते. त्यामुळे ट्रकमध्ये असलेले दोघेजण जखमी झाले. तर एसयुव्ही चालवत असलेल्या तरुणाच्या गुप्तांगाला दुखापत झाली आहे.
FEDEX CRASH: Woman performing oral sex on driver causes vehicle crash into FedEx truck. See the details here 👇https://t.co/ZIo4aFJPDH
— WPLG Local 10 News (@WPLGLocal10) June 3, 2022
अपघातानंतर एसयुव्हीमध्ये प्रवास करणारे हे युगुल अर्धनग्नावस्थेत रस्त्यावर पडलेले दिसले. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी मदत करताना दिसले. मात्र या अपघाताबाबत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. या अपघाताचे फोटो समोर आले आहेत. जे पाहून दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाल्याचे दिसत आहे. एसयुव्हीचा पुढचा भाग पूर्णपणे डॅमेज झाला आहे. तर फेडेक्स ट्रकचाही पुढचा भाग डॅमेज झाला आहे. फोटो पाहून ट्रकच्या एअरबॅग्ज खुले झाले होते. मात्र अजून या अपघातावेळी दोन्ही गाड्यांचा वेग किती होता हे अद्याप समोर आलेले नाही.
























































