
सुनील ग्रोव्हर याच्या ‘सनफ्लॉवर 2’ वेब सीरिजचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ही ब्लॅक कॉमेडी वेब सीरिज लवकरच ओटीटीवर येईल. ‘सनफ्लॉवर 2’ मध्ये अदा शर्माची एंट्री झाली आहे. अदा शर्मा कॉमेडियन सुनील ग्रोव्हर सोबत धमाल उडवणार आहे. ट्रेलर शेअर करताना सुनील ग्रोव्हरने लिहिलंय, मैत्रीत नो सॉरी नो थॅक्यू…
‘सनफ्लॉवर 2’ ही मर्डर मिस्ट्री कथा आहे. त्यामध्ये मुख्य संशयित सुनील ग्रोव्हर आहे. सोसायटीत राज कपूर नावाच्या इसमाचा खून होतो. पोलीस सुनीलला अटक करतात. खरंच सुनीलने खून केलाय की त्याला अडकवलं जातंय, हे लवकरच समजेल. ‘सनफ्लॉवर’चा पहिला सीझन हिट झाला होता. त्यातून सुनीलने ओटीटीवर पदार्पण केले होते.


























































