कचरा व्यवस्थापनासाठी विद्यार्थ्याचा पुढाकार; 15 वर्षीय आरुषने तयार केले अनोखे उपकरण 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झपाटय़ाने वाढणारे शहरीकरण आणि वाढत्या लोकसंख्येमुळे दिवसेंदिवस वाढणारे कचऱयाचे ढीग ही संपूर्ण जगापुढे डोकेदुखी ठरतेय. एका आकडेवारीनुसार देशात महापालिका क्षेत्रात दररोज 1,33,760 मेट्रिक टन घनकचरा तयार होतो. त्यापैकी केवळ 91,152 टन गोळा केला जातो आणि 25,884 टन कचऱयाची विल्हेवाट लावली जाते. कचऱयाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी गुरुग्राममधील आरुष नाथ या 15 वर्षीय विद्यार्थ्याने ‘सावत’ (SAWT) नामक उपकरण तयार केले आहे. एआय आणि सौरऊर्जेचा मदतीने चालणारे हे जगातील पहिले कचरा वर्गीकरण यंत्र आहे. या यंत्रातील एआय प्रणाली कचऱयाचा प्रकार ओळखून त्यानुसार त्याचे वर्गीकरण करण्यास मदत करते. तसेच सौरऊर्जेवर हे यंत्र चालत असल्यामुळे दुर्गम भागातदेखील याचा उपयोग करता येऊ शकतो. हे नावीन्यपूर्ण उपकरण कचऱयाचे पुनर्वापर करता येण्याजोगे किंवा सेंद्रिय कचऱयात आपोआप वर्गीकरण करते.