ज्योती मल्होत्राला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, पाकिस्तान भेटीचा नवीन VIDEO आला समोर

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रा ​​हिला सोमवारी हिसार न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने ज्योतीला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तिला हिसारच्या मध्यवर्ती कारागृह क्रमांक 2 मध्ये ठेवण्यात येईल, जे महिलांसाठी आहे.

दरम्यान, ज्योतीचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये ती पाकिस्तानच्या बाजारात फिरत आहे. त्याच्या आजूबाजूला एके-47 बंदुका असलेले पाकिस्तानी सुरक्षारक्षकही दिसत आहेत. हा व्हिडीओ स्कॉटिश युट्यूबर कॅलम मिलने शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये, ज्योती कॅलमला विचारते, ही तुझी पहिलीच पाकिस्तान भेट आहे का? यावर कॅलम म्हणतो की, मी पाचव्यांदा आलो आहे. ज्योती विचारते की, तुला पाकिस्तान देश कसा वाटला? यावर कॅलम पाकिस्तान झिंदाबादचा नारा देताना व्हिडीओत दिसत आहे.