1 सप्टेंबरपासून एसबीआय क्रेडिट कार्डचे नियम बदलणार

स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) ने आपल्या क्रेडिट कार्डचे नियम बदलणार असल्याची घोषणा केली आहे. 1 सप्टेंबर 2025 पासून नवीन नियम लागू केले जाणार आहेत. या नव्या नियमानुसार, लाइफस्टाईल होम सेंटर एसबीआय कार्ड, लाइफस्टाईल होम सेंटर एसबीआय सिलेक्ट कार्ड, लाइफस्टाईल होम सेंटर एसबीआय प्राईम कार्ड्सवर मिळणारे काही फायदे कमी केले जाणार आहेत. काही रिवॉर्ड पॉइंट्ससुद्धा कमी केले जाणार आहेत. ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर खर्च केल्यानंतर रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीत.