
गेल्या तीन वर्षापासून युक्रेन आणि रशिया यांचे सुरु असलेले युद्ध थांबलेले नाही. अमेरिकेच्या मध्यस्तीच्या प्रयत्नांनाही यश मिळत नाही. त्यातच आता युक्रेनने रशियाच्या प्रमुख गॅस प्रक्रिया प्लांटवर ड्रोन हल्ला केला आहे. त्यामुळे कझाकिस्तानातून होणारा गॅसपुरवठा काही काळ थांबविण्यात आला असल्याचे रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ओरेनबर्ग प्लांट जगातील सर्वात मोठे गॅस उत्पादन आणि प्रक्रिया प्रकल्पांपैकी एक आहे. त्याची वार्षिक क्षमता 45 अब्ज घनमीटर आहे आणि ते कझाकिस्तानच्या कराचगनाक येथून गॅस कंडेन्सेटवर प्रक्रिया करते. हे कझाकस्थानची सरकारी कंपनी गॅसप्रोम चालवते.
ड्रोन हल्ल्यांमुळे प्लांटमधील एका वर्कशॉपमध्ये आग लागली आणि प्लांटच्या काही भागाचे नुकसान झाल्याचे प्रादेशिक गव्हर्नर येवगेनी सोलंटसेव्ह यानी सांगितले. गॅझप्रॉमकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रोन हल्ल्यामुळे प्लांट तात्पुरते कझाकस्तानी गॅसवर प्रक्रिया करू शकत नसल्याचे कझाक ऊर्जा मंत्रालयाने रविवारी सांगितले.
तर युक्रेनचे जनरल स्टाफ यांनी ओरेनबर्ग प्लांटला आग लागली आणि एक गॅस प्रक्रिया आणि शुद्धीकरण युनिटचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे. युक्रेनने अलिकडच्या काही महिन्यांत रशियन ऊर्जा सुविधांवर हल्ले वाढवले आहेत.