
दिल्लीहून पाटण्याला जाणारे स्पाइसजेटचे विमान SG-494 गुरुवारी अर्ध्या रस्त्यातून दिल्लीला वळवावे लागले. हवेत असतानाच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे वैमैनिकाने सतर्कता दाखवत विमान परत दिल्लीकडे वळवण्याचा निर्णय घेतला. विमान दिल्लीला परतत असल्याचे समजताच प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. मात्र, वैमानिक आणि कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
स्पाइसजेटचे हे विमान सकाळी दिल्लीहून पाटण्याकडे रवाना झाले होते. मात्र, उड्डाणानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे समजले. त्यानंतर वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला कळवले आणि तातडीने दिल्लीला परतण्याची परवानगी मागितली. फरिदाबादला पोहोचताच विमान परत दिल्लीला वळवण्यात आले. एअरलाइन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.
स्पाइसजेट फ्लाइट SG-497 गुरुवारी दिल्लीहून पाटण्यासाठी निघाले. टेकऑफ केल्यानंतर काही मिनिटांतच पायलटला तांत्रिक बिघाडाची सूचना मिळाली. त्याने ताबडतोब एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) ला कळवले आणि दिल्लीला परतण्याची परवानगी मागितली. परवानगी मिळाल्यानंतर, विमान फरीदाबादवरून वळवण्यात आले आणि दिल्ली विमानतळावर सुरक्षितपणे उतरवण्यात आले.