
रत्नागिरी तालुक्यातील नाचणे जिल्हापरिषद गटात गद्दारांना धडा शिकवण्यासाठी निष्ठावंत शिवसैनिक आता निवडणूकीच्या रणांगणात उतरला आहे. शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार शशिकांत बारगोडे यांनी प्रचारात बाजी मारली आहे.पंचायत समितीमध्ये कुवारबांव गणात उमेश राऊत आणि नाचणे गणात विजयकुमार ढेपसे यांना प्रचारात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
शशिकांत बारगोडे यांनी पोमेंडी ग्रामपंचायतीच दोन वेळा सरपंचपद भूषविले आहे. सरपंचपदावर असताना गावात अनेक विकासकामे त्यांनी केली आहेत.शशिकांत बारगोडे यांनी घरोघरी प्रचार सुरू केला असून नाचणे जिल्हा परिषद गटात आता नव्या चेहऱ्याला संधी देण्यासाठी जनता उत्सुक असल्याने बारगोडे यांचे पारडे जड आहे. कुवारबांव पंचायत समिती गणातील शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार उमेश राऊत हे कुवारबाव ग्रामपंचायतचे उपसरपंच होते. उमेश राऊत यांचा दांडगा जनसंपर्क आणि सामाजिक कार्यामुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाचणे पंचायत समिती गणातून शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विजयकुमार ढेपसे निवडणूक लढवत आहेत. ढेपसे यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असून त्यांनी घरोघरी जाऊन प्रचार मोहीम राबवली आहे.

























































