
इस्रायलने अमेरिकेच्या मदतीने इराणवर जोरदार हल्ले चढवले आणि युद्धाला तोंड फुटले. गेल्या आठवड्याभरापासून आखातामध्ये हे घनघोर युद्ध सुरू आहे. इस्रायल-अमेरिकेकडून इराणची चौफेर कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सैन्यदल, नौदलापासून ते तेल डेपोपर्यंत सर्वत्र क्षेपणास्त्र, बॉम्ब हल्ले केले जात आहेत. या दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पराभूत राष्ट्र म्हटले. यानंतर काहीच वेळाने इराणने आम्ही सहा महिने युद्ध लढू शकतो असे म्हणत इस्रायल-अमेरिकाला गंभीर इशारा दिला आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्स हा दावा केल्याचे वृत्त ‘फार्स’ या वृत्तसंस्थेने दिला आहे.
इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणचे सशस्त्र दल सध्याच्या ऑपरेशन्सच्या वेगाने किमान 6 महिने तीव्र युद्ध लढण्यास सक्षम आहे, असे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सचे प्रवक्ते मोहम्मद नैनी यांनी म्हटले आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने इस्रायल-अमेरिकेला गंभीर परिणाम भोगण्याचा इशाराही दिला. तसेच अमेरिका आणि इस्रायली सैन्य तळाशी संबंधित 200 हून अधिक ठिकाणांना लक्ष्य केल्याचा दावाही केला.
आगीचे लोळ उठले, धुरामुळे आकाशही दिसेनासे झाले; तेहरानमधील तेल डेपोंवर इस्रायल-अमेरिकेचा मिसाईल हल्ला
इराण मध्य पूर्वेचा दादा राहिला नाही – ट्रम्प
दरम्यान, याआधी अमेरिकेचे राष्ट्राध्य्क्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण मध्य पूर्वेचा दादा राहिला नाही तर मध्य पूर्वेतील पराभूत राष्ट्र बनल्याचे म्हटले होते. इराण शरण येईपर्यंत पराभूत राष्ट्र राहील किंवा कदाचित पूर्णपणे कोसळले, असे म्हणत ट्रम्प यांनी इराणवर विनाशकारी हल्ल्याचा इशाराही दिला होता.
इराणला मोठं सरप्राईज देणार – नेतन्याहू
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पत्रकार परिषद घेत इस्रायली जनतेच्या धैर्याचे आणि एकतेचे विशेष कौतुक केले. देश सध्या एका कठीण काळातून जात असून अनेक आघाड्यांवर आव्हानांचा सामना करत आहे. गेल्या आठवड्यात देशाला अशांतता आणि लष्करी कारवायांसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागले, मात्र अशा परिस्थितीतही नागरिकांनी दाखवलेली जिद्द आणि देशाप्रती असलेली निष्ठा अभिमानास्पद असल्याचे त्यांनी म्हटले केले. शिवाय शत्रूंसाठी पुढे काही खास सरप्राईज असल्याचाही इशारा त्यांनी दिला आहे.





















































