शिव ठाकरे ठरला ‘The 50’चा विजेता; पुन्हा एकदा रिअ‍ॅलिटी शोवर कोरले नाव!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरातील 50 सेलिब्रिटींना घेऊन सुरू झालेला ‘The 50’ हा रिअॅलिटी शो मराठमोळ्या शिव ठाकरे याने जिंकला आहे. या शोचा ग्रँड फिनाले 22 मार्च रोजी पार पडला. यावेळी शिवने फैझल शेखला मागे टाकत विजेतेपदावर नाव कोरले. शिवचा ने जिंकलेला हा दुसरा रिअॅलिटी शो आहे.

​ग्रँड फिनालेमध्ये शिव ठाकरेसोबत फैझल शेख, कृष्णा श्रॉफ आणि इमोर्टल काका हे चार स्पर्धक होते. अंतिम टास्कमध्ये एका अवघड कोडे सोडवण्याचे आव्हान होते. शिवने हे कार्य अवघ्या १० मिनिटांत पूर्ण केले, तर फैसल शेखला १४ मिनिटे लागली. वेळेच्या या गणितात शिवने बाजी मारली आणि ट्रॉफी आपल्या नावे केली.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

शिवच्या चाहत्याला मिळाले 50 लाख

हा शो जिंकल्यानंतर शिवने जिंकलेली 50 लाख रुपये त्याचा चाहता सिताराम प्रल्हाद आघाव याला दिले आहेत. सिताराम प्रल्हाद आघाव हे महाराष्ट्रातील हिंगोंली जिल्ह्यातील शेतकरी आहेत.