हे करून पहा – केसांमध्ये कोंडा झाला तर…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केसामधील कोंडा दूर करण्यासाठी लिंबाचा रस, खोबरेल तेल, कोरफड आणि टी ट्री ऑईल हे अत्यंत प्रभावी घरगुती उपाय आहेत. खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून टाळूला मसाज करा. कोरफडीचा गर टाळूवर लावल्याने खाज आणि जळजळ शांत होते.

सफरचंद सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून त्याने केस धुतल्यास टाळूची पीएच पातळी संतुलित राहते आणि कोंडा दूर होतो. कडुनिंबाच्या पानांचा रस किंवा पेस्ट टाळूवर लावल्यास काsंडा कमी होतो आणि खाज थांबते.