
पुणे महापालिकेतील शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेते नितीन गावडे यांनी महापालिकेत निवडून जाताच हडपसर प्रभागा क्रमांक १६ मधील पाणीप्रश्न मार्गी लावला आहे. येत्या १५ दिवसांत काळेबोराटे नगर येथील गजानन महाराज मंदिराजवळील पाण्याच्या टाकीमधून आणि गाडीतळ पीएमपीएल येथील टाकीमधूनही पूर्णपणे नियमित पाणीपुरवठा सुरू होणार असून प्रभाग क्रमांक १६ मधील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे.
गावडे यांनी पालिकेत जाताच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे तातडीने लक्ष देत कामाला सुरुवात केली आहे. विशेषतः गेल्या अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक १६ हडपसर परिसरात भेडसावत असलेला अनियमित व विस्कळीत पाणीपुरवठ्याचा प्रश्न त्यांनी प्राधान्याने हाती घेतला आहे. या समस्येसंदर्भात सातत्याने पाठपुरावा करत प्रशासनाकडे ठोस उठवला. येत्या पंधरा दिवसाच्या आत पाणीपुरवठ्याची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. या कामासाठी पाणी पुरवठा विभागाचे विभाग प्रमुख नंदकिशोर जगताप, पाणीपुरवठा विभागाचे भंडारी, जैन इरिगेशन कंपनीचे कंत्राटदार यांचा देखील पाठपुरवठा महत्वाचा ठरला.
हे काम आठ दिवसांत पूर्ण होणार होते. मात्र, गजानन महाराज मंदिराजवळील पाण्याची वाहीणीची केलेली जोडणी एमएचला जोडायच्या ऐवजी डीआयला जोडली गेली. त्यामुळे पुन्हा हे काम करावे लागणार आहे. येत्या १५ दिवसांत काळेबोराटे नगर येथील गजानन महाराज मंदिराजवळील पाण्याच्या टाकीमधून आणि गाडीतळ पीएमपीएल येथील टाकीमधूनही पूर्णपणे नियमित पाणीपुरवठा सुरू होणार असून, त्याचा फायदा हडपसर प्रभागा क्रमांक १६ मधील सर्व रहिवाशांना होणार आहे.





























































