40 दिवसांसाठी तैवानचे हवाई क्षेत्र बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण-इस्रायल-अमेरिका युद्ध थांबायचे नाव घेत नसताना आता आणखी दोन देशांमध्ये तणाव वाढला आहे. चीनने तैवान द्वीपजवळ 40 दिवसांसाठी हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तायवानला चीन आपलेच क्षेत्र मानत आहे. या जलक्षेत्रात लढाऊ विमान आणि युद्धनौका पाठवण्याचे काम करत आहे. चीनने आता 6 मेपर्यंत हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे हवाई क्षेत्र दक्षिण कोरियाजवळील पीत समुद्र ते जपानजवळील पूर्वी चीन समुद्रापर्यंत पसरलेले आहे. हे हवाई क्षेत्र का बंद केले आहे, याच्या मागील कारण चीनने उघड केले नाही.