
‘गोलंदाजांचा कर्दनकाळ’ अशी उपाधी मिसरूडही न फुटलेल्या वैभव सूर्यवंशीला यंदाच्या आयपीएमलध्ये मिळाली. त्यानंतर त्याचा हिंदुस्थानी संघातील प्रवेश निश्चित मानला जात होता आणि शनिवारी त्यावर शिक्कामोर्तब झाले. आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यासाठी हिंदुस्थानच्या संघात वैभवची निवड झाली आहे. या निवडीसह वैभवने महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा 38 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला आहे. त्यामुळे वैभव हा हिंदुस्थानचा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये जसप्रीत बुमराहपासून ते मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड, कागिसो रबाडासारख्या गोलंदाजांना वैभवने पळता भुई थोडी केली होती. वैभवने सर्वाधिक 776 धावा रचत ‘ऑरेंज पॅप’ तर पटकावलीच, पण त्याचबरोबर तो स्पर्धेतील ‘सर्वोत्तम खेळाडू’ही ठरला होता. या दौऱ्यात वैभवला संधी मिळणार की नाही, याची उत्सुकता क्रिकेट विश्वाला असणार आहे.
n सचिनची 1989 मध्ये पाकिस्तानच्या दौऱ्यासाठी निवड झाली होती. त्यावेळी त्याचे वय 16 वर्षे आणि 181 दिवस होते. हिंदुस्थानी संघात आता निवड झालेल्या वैभवचे वय 15 वर्षे आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय ठेवताच वैभवने सचिनचा विक्रम मोडला आहे.
























































