सेप्टिक टँक साफ करताना दुर्घटना, विषारी वायूमुळे गुदमरून चार कामगारांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सेप्टिक टँक साफ करताना विषारी वायूमुळे गुदमरून चार कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दागिन्यांच्या कारखान्यात घडली. गुजरातमधील सुरतच्या वराछा खंड बाजार येथे हिऱ्याच्या कारखान्यात रविवारी सकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी घबराट पसरली. घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले.

इंडिया टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, कारखान्यातील सेप्टिक टँकची नियमित सफाई सुरू होती. एक सुपरवायजर आणि तीन कामगार सफाईसाठी टँकमध्ये उतरले होते. मात्र टँकमधील विषारी वायूमुळे चारही जणांचा टँकमध्ये गुदमरून मृत्यू झाला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस सखोल तपास करत आहेत. कंपनीचा निष्काळजीपणामुळे ही घटना घडली का याबाबतही पोलीस तपास करत आहेत.