
कोकणात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने चिपळूण तालुक्यात सकाळपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे चिपळूणमधील प्रसिद्ध सवतसडा धबधबा प्रवाहित झाला असून परिसरात निसर्गाचे मनमोहक रूप खुलले आहे.
सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे उंच कड्यावरून मोठ्या वेगाने कोसळणाऱ्या धबधब्याचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. दरवर्षी पावसाळ्यात सवतसडा धबधबा पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरत असून यंदाही मान्सून सक्रिय होताच परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढल्याचे चित्र आहे.दरम्यान, धबधबा परिसरात दगड निसरडे झाले असून पाण्याचा प्रवाहही वाढलेला असल्याने पर्यटकांनी सुरक्षित अंतर राखून पर्यटनाचा आनंद घ्यावा, तसेच कोणत्याही प्रकारची धोकादायक कृत्ये टाळावीत, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.





























































