
दापोली शहरातील खोत गल्लीत गटाराचे बांधकाम सुरू असल्याने त्या गटाचे पाणी पोस्ट गल्लीतील पेडणेकर ज्वेलर्स समोरील रस्त्यावर उलटल्याने येथे पाणी साचले आहे. त्यामुळे नागरीकांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढत पुढे दापोली अर्बन बॅंकेकडील भागात जावे लागत आहे.
दापोली शहरातील पोस्ट गल्ली मार्ग हा महत्त्वाचा असा मार्ग आहे या मार्गावर साई हाॅटेल , पेडणेकर ज्वेलर्स , श्री. गोपाळकृष्ण पतपेढी , महाराष्ट्र शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभाग , दापोली अर्बन बँक , दापोली तालुका पतपेढी आदीसह विविध महत्वाची दुकाने आहेत. अशा या मार्गावर पेडणेकर ज्वेलर्स समोरील रस्त्यावर पाणी साचले आहे. त्यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे खोत गल्लीत गटाराचे बांधकाम सुरू आहे. त्या गटारातील सांडपाणी आणि पडणाऱ्या पावसाचे पाणी यामुळे या ठिकाणी पाणी भरले. त्यामुळे येथून चालताना गुडघाभर पाण्यातून रस्ता काढत सर्वांना जावे लागत होते. त्यामुळे विशेषतः कामानिमित्त आलेल्या तसेच पोस्ट गल्लीतील रहिवाशांची रस्त्याअभावी मोठी गैरसोय झाली.

































































