
आयबीपीएसतर्फे ‘प्रोबेशनरी ऑफिसर’ आणि ‘मॅनेजमेंट ट्रेनीज’ या पदांच्या ६७१५ जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याच्या पूर्वपरीक्षेसाठी स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाकडून प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी इच्छुक भूमिपुत्रांनी अर्ज करावेत, असे आवाहन महासंघातर्फे करण्यात आले आहे.
स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना नेते, स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष, खासदार अनिल देसाई, महासंघ कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे, महासंघ सरचिटणीस, प्रदीप मयेकर यांच्या सूचनेनुसार पूर्वपरीक्षेचे मोफत ऑनलाईन /ऑफलाईन प्रशिक्षण वर्ग भरवण्यात येणार आहेत. त्यामुळे बँकेच्या वयोमर्यादा अट व नियमांमध्ये योग्य ठरणाऱ्या इच्छुकांनी २१ जुलैपर्यंत www.ibps.in या बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याचे आवाहन महासंघातर्फे करण्यात आले आहे.
प्रशिक्षण वर्गासाठी संपर्क
इच्छुक उमेदवारांनी शिवसेना भवन येथील महासंघाच्या कार्यालयात सायंकाळी ६.३० ते ८.३० या वेळेत चिटणीस शरद एक्के ९८९२६९९२१५, श्रीराम विश्वासराव ९८६९५८८४६९, विलास जाधव ९६१९११८९९९, सुधाकर नर ८३६९४४२९५१ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन महासंघाचे चिटणीस व प्रशिक्षण वर्ग प्रमुख उमेश नाईक यांनी केले आहे.






























































