Ratnagiri News – हर्णे बायपास येथे अपघात दुचाकीस्वाराचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दापोली तालुक्यातील हर्णे आंजर्ले बायपास येथे झालेल्या आयशर व दुचाकी यांच्या अपघातात बाशीद अली दरबार बरमारे या 32 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्णे ते आंजर्ले जाणारे बायपास रस्त्यावरील हॉटेल रेझेंटाकडे जाणाऱ्या बाजूने पुढे सुमारे 100 मीटर अंतरावर आंजर्ले कडून येणाऱ्या टेम्पो चालक गंगाराम रामू माने वय 55 राहणार नवानगर याने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने हयगईने व अविचाराने चालवून हर्णे कडून आंजर्लेकडे जाणारा दुचाकीवा ठोकर देऊन चालक बाशीद अली दरबार बरमारे वय 32 वर्ष राहणार आडे वरचा मोहल्ला यास ठोकर देऊन त्याच्या डोक्यावर आयशर गाडीचे चाक जाऊन डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याचे मरणास कारणीभूत झाला. त्याचप्रमाणे दोन्ही वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत ठरला.  टेम्पो चालक गंगाराम रामू माने याच्या विरोधात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. दापोली पोलीस स्थानकात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 106(1), 125( ब), २८१ मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार करीत आहेत.