
विविध अभियांत्रिकी आणि देखभाल-दुरुस्तीच्या कामाकरीता रविवारी मध्य रेल्वेवरील उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. मेन लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार (अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर) तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे (अप आणि डाऊन हार्बर लाईनवर) हा ब्लॉक परीचालीत करण्यात येईल.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सेवा प्रभावित होतील. सकाळी 10.48 ते दुपारी 3.45 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील.
सकाळी 10.19 ते दुपारी 3.52 या वेळेत घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.
हार्बर लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावरील सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 वाजेपर्यंत, तसेच सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईनवरील सेवा आणि सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वांद्रे/गोरेगावकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईनवरील सेवा रद्द राहतील.
याशिवाय पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या अप हार्बर लाईनवरील सेवा बंद राहतील.
ब्लॉकच्या कालावधीत पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉकच्या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 या वेळेत हार्बर लाईनवरील प्रवाशांना मेन लाईन आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची मुभा असेल.




























































