Mumbai News – दहिसरमध्ये खदाणीत बुडून दोन तरुणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खदाणीत पडून दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी मुंबईतील दहिसर परिसरात घडली. पियुष गुप्ता (19) आणि ओम अंकुश सिंग (19) अशी मयत तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी 10.26 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. दहिसर पूर्व येथील केतकी पाडा परिसरातील शेख खदाणीत दोन तरुण पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली. घटनेची माहिती मिळताच एमएफबी जवानांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही तरुणांना बाहेर काढत शताब्दी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.