धक्कादायक… बनावट सहीशिक्क्याने बेकायदा इमारत केली अधिकृत, चौघांविरोधात मानपाडा पोलिसांत तक्रार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डोंबिवलीतील मानपाडा हद्दीत बनावट सहीशिक्क्याने बेकायदा इमारत अधिकृत केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. जिल्हा परिषदेची बनावट सही आणि खोटा शिक्का वापरला असून याप्रकरणी बळीराम जाधव व अन्य रहिवाशांनी मानपाडा पोलीस ठाण्यात रामचंद्र माने, लक्ष्मण मिसाळ, मोहनलाल चौधरी आणि रामदास टेकाळे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार चाळ पुनर्विकासाच्या नावाखाली रहिवाशांची फसवणूक करून यशवंत कॉम्प्लेक्स नावाने अनधिकृत इमारत उभारण्यात आली. सदनिका घेतलेल्या रहिवाशांनी गृहकर्ज दुसऱ्या बँकेत हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेदरम्यान कागदपत्रांची पडताळणी करताना बनावट सही व शिक्क्याचा वापर झाल्याचे समोर आले.

आरोपींना राजकीय पाठबळ
राजकीय पाठबळ असल्याने आरोपींवर पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला असून तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. अन्यथा कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.