ट्रेंड – स्पायडरमॅनच्या जाळ्यात लोकल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जर स्पायडरमॅनने मुंबई लोकल, बस, टॅक्सी आणि मेट्रो आपल्या जाळ्याच्या मदतीने हवेत लटकवली तर? आणि लोकं त्याचा मोबाईल कॅमेऱ्यात फोटो काढताहेत. तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. असाच एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘स्पायडरमॅनः ब्रँड न्यू डे’ हा चित्रपट लवकरच येत आहे. हा व्हिडीओ एआयच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. कोणीही अवाक् होईल इतका हा व्हिडीओ खरा वाटतोय. सदर व्हिडीओ @mayankesh_vfx या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. CSMT रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेन छताला बांधून ठेवल्यासारखी दिसते. रेल्वे स्टेशनवरची गर्दी, रस्त्यांवरील वाहने आणि परिसर सगळंच खरं वाटतं. लाखो वेळा पाहिल्या गेलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही एकापेक्षा एक भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.