
जबरदस्तीने सेवा शुल्क आकारणाऱ्या रेस्टॉरंट मालकांना चाप लावण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार सरकारने प्रणाली स्थापित केली आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाने कोणत्याही हॉटेलने बिलामध्ये मनमानी सेवा शुल्क जोडणे बेकायदेशीर ठरवले आहे. तक्रार नोंदवण्यासाठी मोबाईलवर NCH अॅप डाउनलोड करा.
ई-दाखील पोर्टलवर (edaakhil.nic.in) देखील तक्रार करू शकता, ज्यामुळे वकिलाच्या सहभागाशिवाय घरबसल्या ग्राहक आयोगाकडे ऑनलाईन तक्रार दाखल करू शकता.
तुमचे बिल आणि तक्रार CCPA ला [email protected] या ई-मेल अॅड्रेसवर पाठवू शकता. तुम्ही जिल्हाधिकाऱयांकडेही तक्रार करू शकता.
एखाद्या रेस्टॉरंटने सेवा शुल्क माफ करण्यास नकार दिला तर तुम्ही राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाईन क्रमांक 1915वर कॉल करून तुमची तक्रार नोंदवू शकता.





























































