
मुंबईकरांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. संपूर्ण बृहन्मुंबई क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या महत्त्वाच्या तलावांपैकी एक असलेला तानसा तलाव आज सकाळी 8.51 वाजेच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागला आहे. तलावात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाल्याने आणि पाण्याची पातळी वाढल्याने प्रशासनाकडून तानसा धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत.
View this post on Instagram
बृहन्मुंबई महापालिका क्षेत्राच्या दैनिक जलपुरवठ्यात तानसा तलावाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या तलावाची एकूण कमाल जलधारण क्षमता 14,508 कोटी लीटर इतकी आहे. पावसाळ्यात तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे मुंबईकर नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.





























































