आयफोन ड्युओच्या सुरक्षेसाठी मोजा 60 हजार! अ‍ॅपलकडून केअर प्लस प्लानची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अ‍ॅपलने नुकताच आपला पहिला फोल्डेबल फोन आयफोन ड्युओ लाँच केला आहे. 256 जीबी स्टोरेजच्या या फोनची किंमत 2 लाख 99 हजार 900 रुपये आहे. 512 जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 3 लाख 24 हजार 900 रुपये, 1 टीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 3 लाख 74 हजार 900 रुपये आणि 2 टीबी स्टोरेजच्या फोनची किंमत 4 लाख 49 हजार 900 रुपये आहे.

एवढा महाग फोन खरेदी केल्यानंतर या फोनची सुरक्षा करण्यासाठी अ‍ॅपलने ‘अ‍ॅपल केअर प्लस’ प्लानची घोषणा केली आहे. हा प्लान खरेदी केल्यानंतर फोन हरवल्यास, फुटल्यास किंवा चोरी झाल्यास चिंता करण्याची गरज नाही.  अ‍ॅपलच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, हिंदुस्थानात आयफोन डय़ुओसाठी अ‍ॅपल केअर प्लस प्लानची दोन वर्षासाठी किंमत 51 हजार 900 रुपये आहे. तर अ‍ॅपल केअरसोबत फोन चोरीला गेला किंवा हरवल्यास 59 हजार 990 रुपये मोजावे लागतील.

अ‍ॅपल केअर प्लस प्लान फी

  • महिना       – 2599 रुपये
  • वार्षिक       – 25,999 रुपये
  • दोन वर्षांसाठी     – 51,900 रुपये

अ‍ॅपल केअर प्लस प्लान फी

  • महिना       – 2999 रुपये
  • वार्षिक       – 29,999 रुपये
  • दोन वर्षांसाठी              – 59,900 रुपये