
अनुकंपा तत्त्वावर क्लार्क म्हणून नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्याला तीन वेळा संधी मिळूनही टायपिंग चाचणी उत्तीर्ण करता आली नाही. त्यामुळे अखेर जिल्हाधिकाऱयांनी कारवाई करत क्लार्क असलेल्या या व्यक्तीला शिपाई पदावर नियुक्ती केली आहे. उत्तर प्रदेशातील बरेली येथे ही घटना घडली.
रेहान असे या लिपिकाचे नाव आहे. त्याला हिंदी टायपिंग परीक्षेत पास होता आले नाही. तो तीन वेळा नापास झाला. शेवटी कनिष्ठ लिपिक असलेल्या रेहान खानची चतुर्थी श्रेणी म्हणून नियुक्ती करण्यात आली. जिल्हा न्यायदंडाधिकारी अविनाश सिंह यांनी कनिष्ठ लिपिकावर कारवाईचे आदेश दिले. रेहान खानशिवाय, इतर कर्मचारीही एक-दोन वेळा टायपिंग परीक्षेत नापास झाले आहेत. त्यांना आता एक संधी दिली जाणार आहे. जिल्हाधिकाऱयांनी या सर्वांना दोन महिन्यांचा वेळ दिला आहे.
g रेहान खान याची अनुकंपा तत्त्वावर 2021 मध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून नियुक्ती झाली होती. त्याला कनिष्ठ क्लार्क म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. त्यामुळे त्याला टायपिंग परीक्षा पास करणे आवश्यक होते.2023 मध्ये त्याची पहिली टायपिंग चाचणी झाली. त्यात तो नापास झाला. दुसरी टायपिंग टेस्ट 2024 मध्ये तेव्हाही तो नापास झाला. 2026 मध्येही तो तिसऱयांदा नापास झाल्याने जिल्हाधिकाऱयाने त्याच्यावर कारवाई केली.





























































