भायखळ्यातील पारशी कुटुंबीयांच्या घरी बाप्पाचे आगमन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदू संस्कृतीमध्ये बाप्पाला एक विशिष्ट स्थान आहे. मात्र बाप्पाची ख्याती फक्त हिंदू धर्मापुरती मर्यादित न राहता सर्व धर्मियांपर्यंत पोहचली आहे. भायखळय़ातील प्रभाग क्रमांक 210 मधील रुस्तम बाग पारसी वसाहतीतील रहिवासी देलझान छोई यांच्या घरीदेखील बाप्पाचे आगमन झाले आहे. छोई कुटुंबीय गेल्या 26 वर्षांपासून बाप्पाची मनोभावी सेवा करत असून बाप्पा त्यांच्या मनोकामना पूर्ण करतो असा त्यांचा दृढ विश्वास आहे.

देलझान छोई आणि त्यांच्या पत्नी शहनाज दरवर्षी बाप्पाची मनोभावे पूजा करतात. शिवसेना उपनेते, भायखळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज पांडुरंग जामसुतकर यांनी छोई कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी उपशाखाप्रमुख रॉनी बगवाडियादेखील उपस्थित होते.