
जपानमधील नागोया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये हिंदुस्थानच्या महिला नेमबाजांनी आपल्या अचूक निशाणा साधत पदकांचा श्रीगणेश केला आहे. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल सांघिक प्रकारात इलावेनिल वलारिवन, सोनम म्हस्कर आणि विनोद विदर्सा या त्रिकुटाने भेदक कामगिरी करत रौप्य पदकावर मोहर उमटवली.
हिंदुस्थानच्या महिला त्रिकुटाने 1898 गुणांची कमाई करत रौप्य पदक जिंकले. तर चीनच्या नेमबाजांनी 1904.2 गुणांसह सुवर्ण, तर जपानच्या नेबाजांनी 1897.1 गुणांसह कांस्य पदकावर नाव कोरले.
Asian Games 2026 | Indian shooters Elavenil Valarivan, Sonam Mhaskar, and Vinod Vidarsa clinched the silver medal in the Women’s 10m Air Rifle Team event at the Asian Games in Nagoya, Japan. pic.twitter.com/izKUpIRgF0
— ANI (@ANI) September 20, 2026
हॉकीत विजयी सलामी
आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने विजयी सलामी दिली आहे. हिंदुस्थानच्या महिला संघाने उझबेकिस्तानचा 19-0 असा धुव्वा उडवला. हिंदुस्थानकडून एकट्या दीपिकाने 8 गोल केले.
!
The Indian Women’s Team begins its Asian Games 2026 campaign with a 19-0 win over Uzbekistan, led by Deepika’s whopping 8 goals.
! India face Indonesia tomorrow. #HockeyIndia… pic.twitter.com/XcZzsS1BOV
— Hockey India (@TheHockeyIndia) September 20, 2026





























































