
लंडनहून ढाकाकडे जाणाऱ्या बांगलादेश एअरलाइन्सच्या विमानात दोन प्रवाशांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या दोन्ही प्रवाशांनी एकमेकांना ठोसे लगावले. या हाणामारीत एका प्रवाशाचा टीशर्ट फाटला. भांडणामुळे आजूबाजूला बसलेल्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली. विमानात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकही उपस्थित होते. हाणामारी वाढल्यानंतर काही प्रवासी आणि केबिन क्रू सदस्यांनी दोघांमध्ये मध्यस्थी केली. हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


























































