एनडीआरएफची वाट न पाहता सरकार दुष्काळग्रस्तांना मदत देणार, 5 ऑक्टोबरनंतर दुष्काळी स्थितीचे पंचनामे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 राज्यातील दुष्काळी परिस्थिती सरकारने गांभीर्याने घेतली असून, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ)ची मदत मिळण्याची वाट न पाहता राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱयांना तातडीची मदत देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. 5 ऑक्टोबरनंतर दुष्काळी स्थितीचे पंचनामे करून केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात येणार असला, तरी त्यापूर्वीच राज्य सरकारने मदतीची तयारी सुरू केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कर्जमाफी योजनेच्या आतापर्यंत तीन याद्या प्रसिद्ध झाल्या असून, पात्र शेतकऱयांच्या पुढील याद्याही तयार करण्यात येत आहेत. सर्व पात्र शेतकऱयांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

पवारांच्या सूचनांचा विचार करणार!

शरद पवार यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत पत्राद्वारे केलेल्या सूचनांचा विचार केला जाईल, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.