Skin Care – चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि डाग घालवण्यासाठी वापरा घरगुती नॅचरल रेटिनॉल सीरम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर बारीक रेषा , सुरकुत्या, त्वचेचा सैलपणा आणि डार्क स्पॉट्स येणे स्वाभाविक आहे. सध्या स्किनकेअर जगतात अँटी-एजिंगसाठी रेटिनॉलला अत्यंत प्रभावी मानले जाते. परंतु बाजारात मिळणारे रेटिनॉल सीरम खूप महाग असतात आणि त्यामुळे अनेकदा संवेदनशील त्वचेवर त्यामुळे जळजळ, लालसरपणा किंवा कोरडेपणा येऊ शकतो. तुम्हाला कोणत्याही रसायनांशिवाय तरुणपणासारखा ग्लो हवा असेल, तर तुम्ही व्हिटॅमिन A ने समृद्ध गाजर आणि कोरफडीच्या मदतीने घरीच 100% नॅचरल प्लांट-बेस्ड रेटिनॉल सीरम बनवून वापरू शकता. जाणून घ्या घरी बनवण्याची पद्धत

साहित्य :
ताजे गाजर किसलेले: 1 लहान

बदाम तेल: 1 मोठा चमचा

एलोवेरा जेल: 2 मोठे चमचे

गुलाब पाणी: 1 मोठा चमचा

व्हिटॅमिन E कॅप्सूल: 1

ग्लीसरीन: 1/2 लहान चमचा

नॅचरल रेटिनॉल सीरम बनवण्याची पद्धत
किसलेल्या गाजरामध्ये 1 मोठा चमचा बदाम तेल किंवा मिसळा. त्यानंतर मंद आचेवर या मिश्रणाला 8 ते 10 मिनिटे वाफवून घ्या, जेणेकरून गाजरामधील बीटा-कॅरोटीन तेलात उतरेल. थंड झाल्यावर सुती कपड्याने गाळून तेल वेगळे करून घ्या. त्यानंतर एका काचेच्या वाडग्यात 2 मोठे चमचे एलोवेरा जेल, 1 मोठा चमचा तयार केलेले गाजराचे तेल, 1 मोठा चमचा गुलाब पाणी, 1/2 लहान चमचा ग्लिसरीन आणि 1 व्हिटॅमिन E कॅप्सूलमधील तेल टाका. त्यानंतर एका चमच्याच्या साहाय्याने हे संपूर्ण मिश्रण 2 मिनिटे व्यवस्थित फेटून घ्या. हळूहळू याचा टेक्सचर हलक्या, मखमली आणि नारंगी रंगाच्या सीरमसारखा होईल. हे सीरम एका स्वच्छ आणि कोरड्या ड्रॉपर असलेल्या काचेच्या गडद बाटलीत भरून ठेवा. हे तुम्ही फ्रिजमध्ये ठेवून 12-15 दिवस सहज वापरू शकता.

वापरण्याची पद्धत
रोज रात्री चेहरा चांगला धुवून वाळवून घ्या. त्यानंतर 3-4 थेंब सीरम घेऊन चेहरा आणि मानेवर खालून वरच्या दिशेने हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर तसेच राहू द्या. यामुळे चेहरा तजेलदार आणि चमकदार दिसेल.