लग्नाआधीच पृथ्वी शॉ आणि आकृती झाले वेगळे; साखरपुड्यानंतर 6 महिन्यांतच घेतला निर्णय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि त्याची गर्लफ्रेंड आकृती अग्रवाल यांचा साखरपुडा काही महिन्यांपूर्वी थाटामाटात पार पडला. पृथ्वीने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर आकृतीसोबतचा साखरपुड्याचा फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. मात्र साखरपुड्याच्या सुमारे 6 महिन्यांनंतर या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आकृतीने याबाबत पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे.

आकृती अग्रवालने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत त्यामध्ये त्यांचे मार्ग आता वेगळे झाले असल्याचे जाहीर केले. त्यांनी परस्पर सहमतीने हा निर्णय घेतला असून दोघांच्या भविष्यातील मार्ग आणि गरजा वेगवेगळ्या असल्याने हा सााखरपुडा मोडल्याचे तिने स्पष्ट केले आहे. तसेच तीने असेही  सांगितले आहे की, चाहत्यांना आणि माध्यमांना विनंती आहे की या कठीण काळात आमच्या खाजगी आयुष्याचा आदर केला जावा आणि कोणत्याही प्रकारच्या अफवा किंवा चुकीचे अंदाज बांधले जाऊ नयेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by AKRITI AGARWAL (@akritiagarwal7)

यापूर्वी जुलै महिन्यातही त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र तेव्हा आकृतीने त्या अफवा असल्याचे सांगत स्पष्टीकरण दिले होते. परंतु आता अधिकृतपणे त्यांनी वेगळे होत असल्याचे जाहीर केले आहे.