
सिन्नर तालुक्यातील माळेगाव येथील जनरल मिल कंपनीवर भारतीय कामगार सेनेचा भगवा झेंडा फडकला. शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत आणि कार्यकारी अध्यक्ष अजित साळवी यांच्या नेतृत्वाखाली संघटनेने हे यश मिळवले आहे. दरम्यान कंपनीतील कामगारांच्या हितासाठी आणि हक्कांच्या रक्षणासाठी नवीन युनिट कमिटीची घोषणा करण्यात आली.
भारतीय कामगार सेनेचे चिटणीस संदीप राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय कामगार सेनेच्या अधिपृत फलकाचे अनावरण करण्यात आले. या युनिटच्या विजयासाठी शिवसेना उपमहानगर प्रमुख राजेंद्र क्षीरसागर आणि मुंबई नेते संदीप गाढवे, बाबा गायकवाड, राहुल ताजनपुरे, प्रवीण जाधव, विकी कीर्तने, अशोक दिघे, लोकेश धनगर, मयूर परदेशी यांनी मोलाचे सहकार्य केले. या नवनिर्वाचित युनिटच्या कार्यकारणीत संदीप कराड यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून जनरल सेक्रेटरी सचिन झनकर, उपाध्यक्ष नीलेश वाजे, खजिनदार रवींद्र शिंदे, चिटणीस हेमंत मोरे यांची निवड करण्यात आली आहे. या अनावरण सोहळ्यात कंपनीतील नवनिर्वाचित कमिटीसह कामगार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगारांच्या विविध प्रश्नांवर आणि हक्कांवर सदैव ठामपणे पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास या वेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.




























































