सरकार गाढ झोपेत होते, बालाघाटात आदिवासी मुलांच्या मृत्यूप्रकरणी राहुल गांधींचा मध्य प्रदेश सरकारवर हल्लाबोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
rahul-gandhi-nashik-visit-address-congress-district-presidents-training-camp-mtdc-resort

मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात आदिवासी मुलांच्या मृत्यूच्या मुद्द्यावरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. मुले जीव गमावत असताना सरकार गाढ झोपेत होते, अशी टीका त्यांनी केली आहे.

राहुल गांधींनी X वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्रीजी, उत्सव साजरा करण्यातून वेळ मिळाला असेल, तर राज्यातील जमिनी वास्तवावरही एकदा नजर टाका. बालाघाटमध्ये आजारपण आणि कुपोषणामुळे निष्पाप मुलांचे जीव जात असताना प्रशासनाकडून अत्यंत संथ गतीने प्रतिसाद मिळाला, यावरून राज्यातील कोलमडलेली आरोग्य यंत्रणा आणि सरकारची असंवेदनशीलता उघडी पडते.

ते म्हणाले, मध्य प्रदेश सरकार आज देशातील सर्वात भ्रष्ट आणि अकार्यक्षम सरकार बनले आहे. तसेच राज्यात बनावट औषधे आणि अवैध दारूमुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, बालाघाटमधील या गंभीर प्रकरणावरून आता राजकारण तापले असून प्रशासनाने प्रभावित भागात आरोग्य तपासणी व लसीकरण मोहीम तीव्र केली आहे.