
घरासमोर खेळत असताना शेजारी उभ्या असलेल्या कारमध्ये गेलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा कारमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला. घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा येथे ही हृदयद्रावक घटना घडली. अंश सुरज केळझरकर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. या घटनेने केळझरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, चिखलवर्धा गावावरही शोककळा पसरली आहे.
कारमधून त्याला बाहेर पडता न आले नाही. बराच वेळ तो कारमध्येच अडकून राहिल्याने तो बेशुद्ध पडला. बेशुद्ध अवस्थेत त्याला कुटुंबीयांनी आणि परिसरातील नागरिकांनी तत्काळ त्याला उपचारासाठी घाटंजी येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र यवतमाळ येथे उपचारादरम्यान अंशची प्राणज्योत मालवली.



























































