
मध्य प्रदेशातील कुनो नॅशनल पार्कमध्ये ‘KGP12’ या हिंदुस्थानात जन्मलेल्या मादी चित्त्याने चार गोंडस बछड्यांना जन्म दिला आहे. विशेष म्हणजे, प्रोजेक्ट चित्ताला नुकतीच चार वर्षे पूर्ण झाली असून, या चौथ्या वर्धापन दिनाच्या दुसऱ्याच दिवशी ही अतिशय आनंददायी बातमी समोर आली आहे. केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.

























































