
कॅद्रातील मोदी सरकारने 15 ऑक्टोबरपासून दोन हजार रुपयांच्या वरच्या यूपीआय पेमेंटसाठी 0.4 टक्के मर्चंट डिस्काउंट रेट (एमडीआर) लागू करण्याची घोषणा केली आहे. पेंद्राच्या या निर्णयामुळे खरेदीनंतर यूपीआयवरून दोन हजारांपेक्षा जास्त पेमेंट केल्यास एमडीआर द्यावा लागणार आहे. या निर्णयाला सर्वच स्तरांतून विरोध होत आहे. परंतु यूपीआयसाठी एमडीआर लागू होण्याआधीच देशभरात कॅशची मागणी वाढली आहे.
आरबीआयच्या आकडेवारीनुसार ऑगस्टच्या अखेरपर्यंत कॅशची मागणी 42.86 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे यात वार्षिक आधारावर 12.5 टक्के वाढ झाली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरपासून कॅशचा व्यवहार वाढला आहे. देशातील चलनामध्ये सध्या कॅशचा व्यवहार वाढला असला तरी जीडीपीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 21 म्हणजेच कोविडच्या वर्षानंतर लागोपाठ घसरण येत आहे. आर्थिक वर्ष 21मध्ये चलनात कॅश जीडीपीसाठी 14.4 टक्क्यावर पोहोचली होती. कॅशच्या मागणीत लागोपाठ वाढ होत आहे. ऑगस्टमध्ये यूपीआय वाढीसह डिजिटल देवाणघेवाणीची संख्या वार्षिक आधारावर 22.5 टक्के आणि मूल्याच्या आधारावर जवळपास 20 टक्के वाढ झाली आहे. एमडीआर लागू झाल्यानंतर अवघ्या काही महिन्यात कॅशच्या देवाणघेवाणीत मोठी वाढ पाहायला मिळेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
पैसाबाजारवर फंड
पैसाबाजारने प्लॅटफॉर्मवर म्युच्युअल फंड सेवा सुरू केली आहे. अनियमित उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी ‘डेली एसआयपी’ सुविधा आणली आहे. यामुळे दररोज लहान रक्कम गुंतवण्याची सुविधेसोबत प्लॅटफॉर्मवर बॉण्ड्स, मुदत ठेवीही उपलब्ध आहेत.
असेन्सोची गुंतवणूक
‘असेन्सो टायर्स’ने 100 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक भारतातील उत्पादन सुविधांमध्ये ऑल स्टील रॅडियल जायंट मायनिंग टायर्सची निर्मिती क्षमता वाढवण्यासाठी वापरली जाईल.
झिरो फॉरेक्स मार्कअप
आयडीएफसी फर्स्ट बँकेने सर्व विद्यमान आणि नवीन व्रेडिट कार्डधारकांसाठी विनाअट ‘झिरो फॉरेक्स मार्कअप’ सुविधा जाहीर केली आहे. यासाठी नवीन कार्ड घेण्याची किंवा ठराविक खर्चाची अट नाही. आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर ग्राहकांना फॉरेक्स शुल्काची बचत होणार आहे.
ब्रिजस्टोन इंडिया
ब्रिजस्टोन इंडियाच्या मोबिलिटी सोशल इम्पॅक्ट अवॉर्ड्स 2026च्या 6व्या आवृत्तीत 3 स्वयंसेवी संस्थांना समाजासाठी केलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल गौरविण्यात आले. या वेळी ब्रिजस्टोन इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजर्षी मोइत्रा उपस्थित होते.
महाराष्ट्र इम्पॅक्ट अँड इनोव्हेशन हब मंचाची पायाभरणी
तळागाळातील नागरिकांपर्यंत दर्जेदार आणि परवडणाऱया आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र इम्पॅक्ट अँड इनोव्हेशन हब’ या मंचाची पायाभरणी केली आहे. महाराष्ट्र इम्पॅक्ट अँड इनोव्हेशन हब, आरोग्य नवोपक्रम आणि गुणवत्ता सुधारणा यासाठीचा राज्यस्तरीय मंच याच दृष्टिकोनातून विकसित केला जात आहे. याद्वारे महाराष्ट्र शासनाच्या ‘हेल्थ फॉर ऑल’ या उद्दिष्टाप्रती असलेल्या वचनबद्धतेला पुढे नेण्यास मदत होईल.
अॅमेझॉन नाऊची 1 बिलियन डॉलरची विक्री
अॅमेझॉन नाऊने गेल्या तीन महिन्यांत हिंदुस्थानात 1 बिलियन डॉलर वार्षिक एकूण विक्रीचा टप्पा ओलांडला आहे. लॉन्च झाल्यापासून प्रत्येक तिमाहीत अॅमेझॉन नाऊच्या ऑर्डर दुप्पट झाल्या आहेत. सणासुदीच्या हंगामापूर्वी पंपनीने 10 आठवडय़ांपेक्षा कमी वेळात अॅमेझॉन नाऊचा विस्तार 4 पट अधिक शहरांमध्ये करून डिलिव्हरी 60पेक्षा अधिक शहरे व गावांपर्यंत पोहोचवली आहे. जून 2026मध्ये अॅमेझॉनने अॅमेझॉन नाऊचा विस्तार देशभरातील 300पेक्षा अधिक शहरांत झाला.
लाइमलाईटचे कल्याणमध्ये 8वे स्टोअर
लॅब ग्रोन डायमंड ज्वेलरी ब्रँड असलेल्या लाइमलाईट लॅब ग्रोन डायमंड्सने कल्याणमध्ये नवे एक्सक्लुझिव्ह स्टोअर सुरू केले. हे मुंबईतील ब्रँडचे आठवे स्टोअर आहे. या स्टोअरचे उद्घाटन लाइमलाईट लॅब ग्रोन डायमंड्सचे संचालक करमज्योत चावला, रिजनल पार्टनर ललित सोनी यांच्या हस्ते झाले. लाइमलाईटसाठी एक महत्त्वाचा टप्पा असून या प्रदेशावरील आमचा सातत्यपूर्ण विश्वास यातून दिसून येतो, असे पूजा माधवन म्हणाल्या.
सोनाटाची अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसशी भागीदारी
सोनाटा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी लिमिटेडने एंटरप्रायझेससाठी क्लाउडचा स्वीकार आणि आधुनिकीकरण वेगवान करण्यासाठी अॅमेझॉन वेब सर्व्हिसेस सोबत पाच वर्षांच्या धोरणात्मक सहकार्य करारावर स्वाक्षरी केली आहे. वाढत्या एआय आणि क्लाउड परिवर्तनाच्या संधींचा सामना करण्यासाठी दोन्ही पंपन्या भारतात संयुक्त गो-टू-मार्पेट धोरण राबवतील. एडब्ल्यूएससोबतचे हे 5 वर्षांचे सहकार्य आहे.
कस्टमर सर्व्हिससाठी ‘एआय’चा वापर
एअर इंडिया कस्टमर सर्व्हिसच्या संपूर्ण क्षेत्रात एजंटपर्ह्सचा वापर वाढवत आहे. यासाठी सेल्सपर्ह्स एजंटपर्ह्सची मदत घेतली जात आहे. एआय एजंट्स आता विमान प्रवास सेवेतील विविध प्रकारच्या गुंतागुंतीच्या कामांवरही उपाय शोधण्यासाठी वापरले जात आहेत. व्हॅलिडेशन्स, अप्रूव्हल्स आणि बॅक-एंड रिफंड प्रोसेसिंगची कामे केली जात आहे.



























































