
एक छोटासा भक्त आपल्या बोबड्या आवाजात गणपती बाप्पाची आराधना करत आहे. हाती पंचारती घेऊन ‘जय देव, जय देव’चे आर्जव करत चिमुरडा बाप्पाच्या पूजेत मग्न झाला आहे. एकूणच या छोटय़ा भक्ताची निस्सीम भक्ती पाहून नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. @growingwith_raghav या इंस्टा आयडीवरून हा व्हीडिओ शेअर करण्यात आला असून आतापर्यंत 91 हजारांहून अधिक जणांनी हा व्हिडीओ पहिला आहे.
एकाने कमेंट केली आहे की, ‘किती गोड ते पिल्लू, बाप्पा नक्कीच तुला खूप आशीर्वाद देणार बाळा’, एक जण लिहितो ‘ही भक्ती पाहून बाप्पा हसला आणि विचारलं काय हवं तुला सांग’.





























































