घाटकोपरमध्ये बाप्पाची रिक्षातून स्वारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घाटकोपर मधील वरिया पुटुंबियांच्या घरी रिक्षातून गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. रिक्षात बसलेल्या या बाप्पाच्या आगमनासाठी राहुल वरिया यांनी संपूर्ण मुंबई देखावाच्या माध्यमातून उभी केली आहे. राहुल यांचे वडील गोपाळ यांनी रिक्षातून मुंबईकरांना दिलेल्या 40 वर्षांच्या सेवेला समर्पित म्हणून हा देखावा सादर करण्यात आल्याचे वरिया पुटुंबीयांनी सांगितले. यंदाचा त्यांच्या बाप्पाचे 15 वे वर्ष आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर दिवस-रात्र धावणारी रिक्षा म्हणजे मुंबईच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. याचाच एक भाग म्हणून संतोष यांनी त्यांच्या वडिलांच्या प्रतीकात्मक पुतळ्यासह त्यांच्या आयुष्यातील असंख्य आठवणी, मुंबईच्या रस्त्यांवरचा त्यांचा प्रवास आणि रिक्षेशी जोडलेलं त्यांचं आयुष्य असा सुंदर देखावा उभारला आहे. विशेष म्हणजे त्यांनी शाडूच्या मातीपासून घरीच बाप्पाची मूर्ती तयार केली आहे. वर्गीय पुटुंबीयांनी याआधीही मुंबई लोकल, बेस्ट बस, जुनी ट्राम, मेट्रो असे विविध देखावे सादर केले आहेत.