
जगप्रसिद्ध गुंतवणूकदार वॉरन बफे यांनी बर्कशायर हॅथवेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. कंपनीने याची शुक्रवारी माहिती दिली. बफे हे आता कंपनीच्या संचालक मंडळावर कायम राहून बर्कशायर हॅथवेला मार्गदर्शन करत राहतील. वॉरन बफे यांच्या राजीनाम्यानंतर त्यांचा मुलगा हॉवर्ड बफे यांची बर्कशायर हॅथवेचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ग्रेग एबेल हे बर्कशायर हॅथवेचे सीईओ म्हणून कायम राहतील.

























































