Crime news – टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून गुंतवणूक फसवणूक, ‘ओटीपी फार्मिंग’ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime news new

टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून शेअर बाजारातील गुंतवणुकीचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या परदेशातील सूत्रधारांना बनावट व्हॉट्सअॅप अकाउंट उपलब्ध करून देणाऱ्या ‘ओटीपी फार्मिं ग’ रॅकेटचा सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या प्रकरणातील तक्रारदारांना आरोपींनी शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांना वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये तब्बल 22 लाख 30 हजार रुपये भरण्यास भाग पाडून फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणात प्रमोद कुमार ऊर्फ बिपिन, धर्मेंद्र गुप्ता आणि राजीव कुमार गुप्ता यांना अटक करण्यात आली आहे. प्रमोद कुमार हा बनावट सिम कार्डच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप अकाउंट तयार करून त्याचे ओटिपी टेलिग्राम व सिग्नल अॅपच्या माध्यमातून कंबोडियातील आरोपींना पुरवत असल्याचे तपासात समोर आले आहे.

अशी होती फसवणुकीची पद्धत

या रॅकेटमध्ये आरोपी साध्या कीपॅड मोबाईलचा वापर करून ‘ओटिपी फार्मिंग’ सेटअप चालवत होते. बनावट सिम कार्डच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणावर ओटिपी तयार करून ते कंबोडिया तसेच परदेशातील मुख्य सूत्रधारांना टेलिग्रामद्वारे विकले जात होते. एका ओटिपीसाठी 13 यूएसडिटी इतका मोबदला मिळत असल्याचे तपासात नमूद आहे.

जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाची हत्या देवनारमध्ये तिघे ताब्यात

जुन्या भांडणाचा राग मनात धरून तीन जणांनी संगनमताने तरुणावर लाकडी दांडक्याने हल्ला करून त्याची हत्या केल्याची घटना देवनार परिसरात घडली. या प्रकरणी देवनार पोलिसांनी तिन्ही संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.

17 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6.30 ते 7 वाजण्याच्या सुमारास देवनार सर्कल रोडवरील भूपेश गार्डन येथे जुन्या भांडणाच्या रागातून तीन इसमांनी आपसात संगनमत केले. त्यानंतर फिर्यादींचा मुलगा जोहेब ऊर्फ सोनू याला जीवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी दांडक्याने मारहाण केली. या हल्ल्यात जोहेब ऊर्फ सोनू याचा मृत्यू झाला. या घटने प्रकरणी देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलीस चौकीतून वॉकीटॉकी चोरली

व्ही. पी. मार्ग पोलीस ठाण्याच्या दोन टाकी पोलिस चौकीतून वॉकी टॉकी चोरीला गेल्याचा प्रकार आज घडला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून व्हि पी मार्ग आरोपी आणि वॉकीटॉकीचा शोध घेत आहेत. दोन टाकी पोलीस चौकीत वॉकी टॉकी चार्ंजगला लावण्यात आली होती. दरम्यान चौकीत कोणी नसल्याचे हेरून अज्ञात व्यक्तीने ती वॉकीटॉकी उचलून नेली. काही वेळानंतर संबंधित पोलिस ती घेण्यासाठी गेले असता वॉकीटॉकी चोरीचा प्रकार समोर आला. वॉकीटॉकी हा पोलिस दलाचा महत्वाचा घटक आहे. त्यावरून महत्वाचे संदेश दिले जातात. गणेशोत्सवाच्या काळात वॉकीटॉकी पोलिस चौकीतून लंपास झाल्याने पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. याप्रकरणी व्हि पी मार्ग पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे.

विमानतळावरून सोन्याची भुकटी जप्त

सोन्याची भुकटीच्या तस्करीप्रकरणी एकाला सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने अटक केली. प्रशांत विजय शर्मा असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून जप्त केलेल्या सोन्याची किंमत सुमारे 1 कोटी 38 लाख रुपये इतकी आहे. त्याला अटक करून आज न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. प्रशांत हा हनोई ते मुंबई असा विमानाने प्रवास करत होता. गुरुवारी तो छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आला. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या बॅगेची झडती घेण्यात आली.