देवाला नाचवण्याचा अहंकार बाळगणाऱ्यांना देवानेच नाचवले, बांकीपूरमधील भाजपच्या पराभवानंतर अखिलेश यादव यांची टीका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील भारतीय जनता पक्षाच्या पराभवावरून जोरदार टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट एक करत या पराभवाला केवळ एक निवडणूक निकाल न मानता, जनतेचा संताप आणि तरुणांच्या वाढत्या क्रोधाचे प्रतीक म्हटले आहे. भाजपवर अनेक गंभीर आरोप करत त्यांनी हा निकाल डबल इंजिन सरकारची डबल हार असल्याचे म्हटले आहे.

अखिलेश यादव यांनी X वर पोस्ट करत म्हटले आहे की, ज्यांना आपण देवालाही नाचवू शकतो असा अहंकार होता, त्यांना आता खुद्द देवानेच नाचायला लावले आहे. स्वतःला देवापेक्षाही वरचढ समजणाऱ्यांना देवाने चालत्या गाडीतून खाली उतरवत त्यांच्या गर्वाचे घर खाली काता आहे. त्यांचा हा टोला भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्या एका प्रचारसभेच्या संदर्भात होता. हा ऐतिहासिक निकाल म्हणजे तरुणांची एकजूट आणि त्यांच्या पालकांच्या उद्रेकाचा संयुक्त परिणाम असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.

या पराभवानंतर भाजपमध्ये राजीनाम्यांची मागणी जोर धरेल आणि पक्षांतर्गत कलह वाढेल, असा दावा अखिलेश यादव यांनी केला. स्वतःची विधानसभा जागा न वाचवू शकणाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पुढची राजकीय लढाई कशी लढली जाईल, असा सवाल करत त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावर निशाणा साधला. ज्या नेत्यांना पीडीए समाजातील असल्यामुळे जाणीवपूर्वक राष्ट्रीय स्तरावरील पदे नाकारून राज्यापुरते मर्यादित ठेवण्यात आले, ते नेते आज या निकालावर सर्वाधिक खूश असतील, असा चिमटाही त्यांनी काढला. राष्ट्रीय अध्यक्षांना जर स्वतःची जागा जिंकता येत नसेल, तर राज्याध्यक्ष निवडणूक लढवण्याची हिंमतही कशी करतील, अशी चर्चा आता जनताच करत असल्याचे ते म्हणाले.