लैंगिक अत्याचार प्रकरणी तरुण तेजपालला 10 वर्षे कारावासाची शिक्षा, लाखोंचा दंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई उच्च न्यायालयाने तहलकाचा संस्थापक तरुण तेजपालच्या शिक्षेवर गुरुवारी दुपारी निकाल दिला आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी न्यायालयाने तेजपालला विविध कलमांखाली 10 वर्षे कारावासाच्या शिक्षेसह लाखोंचा दंड ठोठावला आहे. न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले आणि अमित जामसांदेकर यांच्या खंडपीठाने तेजपाल याला लैंगिक छळासाठी दोषी ठरवत शिक्षा सुनावली.

भारतीय दंड संहितेच्या कलम 376(2)(फ) अंतर्गत तेजपालला 10 वर्षांच्या सक्त कारावासाची आणि 5 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच, कलम 376(2)(के) अंतर्गत 10 वर्षांचा सक्त कारावास आणि 5 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली. याव्यतिरिक्त, कलम 354अ अंतर्गत एक वर्षाच्या सक्त कारावासाची आणि 10 हजार रुपयांच्या दंडाची, आणि कलम 354ब अंतर्गत एक वर्षाच्या सक्त कारावासाची आणि दंड, कलम 354ब अंतर्गत तीन वर्षांच्या सक्त कारावासाची शिक्षा सुनावली.

2013 मध्ये ‘तेहलका’च्या एका कनिष्ठ महिला कर्मचाऱ्याने तरुण तेजपालवर गोव्यातील एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये लैंगिक छळाचा आरोप केला होता. तेजपालने हे आरोप फेटाळले होते. याप्रकरणी गोव्यातील सत्र न्यायालयाने मे 2021 मध्ये त्याला सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले होते. यानंतर, गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले. यावर गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान न्यायालयाने गोवा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द करत तेजपालला दोषी ठरवत शिक्षा सुनावली.