Ratnagiri News – आला रे आला… गोविंदा आला! चिपळूणमध्ये ‘निष्ठावंतांच्या दहीहंडी’चा थरार, भगव्या एकजुटीच्या उत्सवाला सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
“आला रे आला… गोविंदा आला!” या जयघोषाने चिपळूणच्या राजकीय-सामाजिक वातावरणात दहीहंडीचा उत्साह संचारला असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चिपळूण तालुका शहर पक्षातर्फे आयोजित ‘निष्ठावंतांच्या दहीहंडी’ची जोरदार तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही कै. अण्णासाहेब खेडेकर क्रीडा संकुलासमोर या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे.
दहीहंडीचा उत्सव म्हटला की थर, ताकद, जोश आणि जल्लोष आलाच; पण चिपळूणच्या शिवसैनिकांसाठी यंदाची दहीहंडी यापेक्षा काहीशी वेगळी आहे. ही केवळ हंडी फोडण्याची नाही, तर निष्ठा जपणाऱ्या शिवसैनिकांच्या एकजुटीची दहीहंडी आहे. राजकारणात परिस्थिती बदलते, समीकरणे बदलतात, सत्तेची गणिते बदलतात, मात्र विचारांशी निष्ठा आणि संघटनेशी बांधिलकी कायम ठेवणाऱ्यांची ताकद वेगळीच असते. याच निष्ठेला सलाम करणाऱ्या ‘निष्ठावंतांच्या दहीहंडी’चा उत्सव चिपळूणमध्ये रंगणार आहे.
या उत्सवाच्या मंडप व स्टेज उभारणीच्या कामाचा शुभारंभ चिपळूण तालुकाप्रमुख बळीराम गुजर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी शिवसेना, युवा सेना, महिला आघाडी, युवती सेना तसेच विविध अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी तालुका समन्वयक सुधीर शिंदे, शहरप्रमुख सचिन कदम, युवा सेना शहराधिकारी पार्थ जागुष्टे, उपशहर प्रमुख तथा नगरसेवक व गटनेता मिथिलेश नरळकर, नगरसेवक अजय भालेकर, नगरसेविका कांचन शिंदे, नगरसेविका वैशाली कदम, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख सचिन चोरगे, उपजिल्हा संघटक ऐश्वर्या घोसाळकर, शहर सचिव प्रशांत मुळये, महिला आघाडी शहर समन्वयक श्रद्धा घाडगे, उपतालुकाप्रमुख सचिन शेट्ये, संदीप राणे, उपशहर प्रमुख राजू विखारे, राजन खेडेकर, मनोज पांचाळ, रियान मालदार, विभागप्रमुख दीपक ओकटे, पांडुरंग निवाते, मुबीन शहा, संतोष मिरगल, सागर सावंत, मंगेश कोकीरकर, मयूर फटकुरे, उपविभाग प्रमुख महेंद्र कांबळी, शाखाप्रमुख हनुमंत चव्हाण, महेंद्र काणेकर, समीर माळी, युवासेना विभागप्रमुख निलेश आवले, शिवसैनिक बुवा खेतले, प्रमोद लोटेकर, राहुल लोटेकर, हर्ष लोटेकर यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थर हंडीचे असतील… पण उंची निष्ठेची असेल! दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदांच्या प्रत्येक थराला दुसऱ्या थराचा आधार लागतो. राजकारणातही संघटनेची खरी ताकद ही एकजुटीतूनच निर्माण होते. एकाचा हात दुसऱ्याच्या खांद्यावर आणि सर्वांची नजर एकाच ध्येयावर हीच दहीहंडीची शिकवण आणि हाच शिवसेनेच्या संघटनात्मक वाटचालीचा आत्मा. चिपळूणमध्ये यंदाची ‘निष्ठावंतांची दहीहंडी’ याच एकजुटीचा आणि निष्ठेचा भगवा संदेश देण्यासाठी सज्ज होत आहे.