Caribbean Premier League मध्ये दक्षिण आफ्रिकेचं वादळ! डिकॉकची धुवाँधार फलंदाजी, शतक ठोकत विराट-वॉर्नरशी बरोबरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॅरिबियन प्रीमियल लीगमध्ये (CPL) दक्षिण आफ्रिकेच्या वादळाने गोलंदाजांची धुलाई करत खणखणीत शतक ठोकलं आहे. क्विंटन डिकॉकने बारबाडोसकडून खेळताना त्याने 57 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 106 धावांची वादळी खेळी केली आहे. हे शतक त्याच्यासाठी ऐतिहासिक ठरलं असून त्याने टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर डेव्हिड व्हॉर्नर यांच्याशी बरोबरी साधली आहे.

क्विंटन डिकॉकच हे धमाकेदार शतक त्याच्या टी-20 कारकिर्दीमधील 10 वे शतक ठरले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-20 सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या खेळाडूंच्या क्रमवारीत त्यांनी तिसऱ्या क्रमांकावर उडी मारली आहे. हाच तिसरा क्रमांक संयुक्त पणे विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नर यापूर्वीच पटकावला आहे. आता या दोघांसोबत डेव्हिड व्हॉर्नरच्या नावाचाही समावेश झाला आहे. टी-20 मध्ये सर्वाधिक शतक ठोकणाऱ्या खेळाडूंमध्ये पहिल्या क्रमांकावर ख्रिस गेल (22 शतके) आणि दुसऱ्या क्रमांकावर बाबर आझम (13 शतके) या खेळाडूंचा समावेश आहे. क्विंटन डिकॉकने आपल्या ४५७ व्या टी-२० सामन्यात ही ऐतिहासिक कामगिरी केली असून, यादरम्यान त्याच्या एकूण धावा १२८६७ वर पोहोचल्या आहेत.

दरम्यान, डिकॉकच्या या शतकी खेळीच्या जोरावर बारबाडोस संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकांत 217 धावांचे मजबूत आव्हान उभे केले होते. परंतु, सेंट किट्स अँड नेविस पॅट्रियट्सच्या फलंदाजांनी बारबाडोसच्या विजयी स्वप्न उद्ध्वस्त करून टाकलं. सेंट किट्सकडून सलामीवीर जॉनसन चार्ल्सने 45 चेंडूंत 78 धावांची धडाकेबाज खेळी केली, तर जेसन होल्डरने अखेरीस फलंदाजी करताना संघाला विजयापर्यंत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली. सेंट किट्सने 19.1 ओव्हरमध्ये 4 गडी गमावून 220 धावा करत 6 गडी राखून हा सामना आपल्या नावावर केला.