उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार; दोन दिवसांत 12 जणांचा मृत्यू, 3 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडमध्ये पावसाने हाहाकार माजवला असून पावसाळी दुर्घटनांमध्ये दोन दिवसात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. हवामान विभागाने बुधवारी डेहराडूनसह तीन जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाला खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, हवामान विभागाने डोहराडून, नैनीताल आणि बागेश्वर जिल्ह्यांत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच, राज्यातील उर्वरित जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला असून, तिथेही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

गेल्या 24 तासांत राज्यातील अनेक ठिकाणी अति मुसळधार पाऊस झाला. नैनीताल शहर 217 मिमी, भीमताल 161 मिमी, मुक्तेश्वर 140 मिमी, हल्द्वानी 122 मिमी, धारी 114 मिमी, कैंची धाम 105 मिमी, कुश्यकुटोली 93.5 मिमी, खान्स्यू 92 मिमी आणि बेतालघाट 80.5 मिमी, झूलाघाट (पिथौरागढ) येथे 78.5 मिमी, चंपावत येथे 74 मिमी आणि कालाढुंगी (नैनीताल जिल्हा) येथे 66.5 मिमी पावसाची नोंद झाली, तर इतर जिल्ह्यांमध्येही मध्यम ते मुसळधार पाऊस झाला.